शिवसैनिकांचे स्वप्न साकार; उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुंबई | अखेर शिवतिर्थावर आज आवाज घुमलेला आहे, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की….! उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे 29 वे तर शिवसेनेचे 3 रे मुख्यमंत्री म्हणून ठीक सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. शिवतिर्थावर उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी मोठी तयारी करण्यात आली होती. विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्री तसेच राज्यातील अनेक नेते या शपथविधीसाठी उपस्थित आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे हे शपथबद्ध झाले. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुन शपथ घेतली. यानंतर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई हे देखील शपथबद्ध झाले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे उपस्थितांसमोर नतमस्तक झाले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी टाळ्यांचा मोठा कडकडाट केला.

 

महत्त्वाच्या बातम्या-