मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे हे माझे लहान भाऊ आहेत असा उल्लेख आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केला. मुंबईतल्या मेट्रोच्या कामांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं त्याचवेळी झालेल्या भाषणात उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ आहेत असा उल्लेख मोदींनी केला.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणत कौतुक केलं. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा केला. तसेच सगळ्या उपस्थितांना गणेश उत्सवच्या शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं किती गोष्टींसाठी अभिनंदन करु? काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं. आता समान नागरी कायदा आणि राम मंदिराचं स्वप्नही पूर्ण होईल असाही विश्वास उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केला.
एवढंच नाही तर महाराष्ट्रात पुन्हा युतीचंच सरकार येईल आम्हाला सत्तेची हाव नाही मात्र सत्ता हवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. आपल्या ताकदीचा सदुपयोग करणारा नेता देशाला सापडला आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मेट्रो प्रकल्पांची माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयांचंही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. यानंतर भाषणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख लहान भाऊ असा उल्लेख केला.
मेट्रोचं जाळं पसरवण्याचा श्रीगणेशा गणेशोत्सवात केला जातो आहे. यामुळे मुंबईतल्या पायाभूत सुविधांना नवे आयाम प्राप्त होतील असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मुंबई असं शहर आहे ज्या शहराने संपूर्ण देशाला गती दिली. आपल्या भाषणात त्यांनी गणेशोत्सवाच्या मराठीत शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदी पोहचले विलेपार्लेच्या गणपतीचं दर्शनासाठी – https://t.co/u8rTLx4hCN @narendramodi #GanpatiBappaMorya
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
“आता शरद पवार अन् अजित पवार भाजपमध्ये येतील की काय?” – https://t.co/w0hSyqCFuP @ShivajiAKardil1 @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @NCPspeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019
…म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नागपूर दौरा रद्द – https://t.co/SjNlbqglrd @narendramodi @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 7, 2019