मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली CAA, NRC आणि NPR बाबतची भूमिका!

नवी दिल्ली |  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज प्रथमच मोदींना भेटले. या भेटीचा वृत्तांत त्यांनी माध्यमांसमोर मांडला. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर आणि त्यांच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि लोकसंख्या सुची (NPR) या मुद्द्यांवर मोदींशी चर्चा केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नागरिकत्व कायद्याबद्दल घाबरण्यासारखे काहीही कारण नाही…आम्ही त्याचं समर्थनच करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहे. राज्यातील एकाही नागरिकावर अन्याय होणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुनही (NRC) त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकार हा कायदा आणल्यानंतर त्याच्यात काही चुकीचं निघालं तर आम्ही विरोध करु, असं ते म्हणाले आहेत. तसेच एनपीआर ही नियमित फेरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सीएए आणि एनपीआरबाबत काँग्रेसबरोबर चर्चा सुरु आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात शांतता आहे, असं उद्धव म्हणाले. याशिवाय आमचे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालू आहे, आम्ही मन बनवलं आणि कॉमन मिनीमम प्रोग्रामनुसार सरकार पुढं जात आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“MIM हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे”

-15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल- मनसे

-अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जागा द्या, नाहीतर…- रामदास आठवले

-वारिस पठाणांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार- आव्हाड

-उदयनराजेंच्या खासदारकीला संजय काकडेंचा आक्षेप; म्हणाले, उदयनराजेंचं योगदान काय??