शरद पवारांच्या ‘मशीदी’संदर्भातल्या वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होईल- विश्व हिंदू परिषद

पिंपरी | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मशिदीसाठी न्यासाची स्थापना करण्याची केलेली मागणी म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांड यांनी केली आहे.

शरद पवारांसारख्या जबाबदार नेत्याने असं बेजबाबदार वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं असल्याचं परांड यांनी म्हटलं आहे. त्यांनी बोलताना जरासं भान ठेऊन बोलायला हवं, असंही ते म्हणाले.

राम मंदिरासाठी केंद्राने ट्रस्टची स्थापना केली आहे तर मग मशिदीसाठी ट्रस्टची स्थापना का केली जाऊ नये? असा सवाल  त्यांनी केलाकेला होता. सरकारने अयोध्येत मशीद बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं होतं.

दरम्यान, वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिलिंद परांड म्हणाले, ” पठाण यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे धमकी आहे. त्यांनी भारताचा इतिहास अभ्यासावा आणि आपलं तोंड बंद ठेवावं. हिंदूना धमकवण्याचे चांगले परिणाम होणार नाहीत”.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदींना भेटल्यावर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली CAA, NRC आणि NPR बाबतची भूमिका!

-“MIM हा मुसलमानांचा पक्ष नाही तर तो रझाकारांचा पक्ष आहे”

-15 कोटीच काय अख्खा पाकिस्तान आणा… आम्ही थुंकलो तरी तुम्ही वाहून जाल- मनसे

-अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जागा द्या, नाहीतर…- रामदास आठवले

-वारिस पठाणांच्या भडकाऊ भाषणाला ‘आम्ही भारताचे लोक’ राज्यघटनेने उत्तर देणार- आव्हाड