“मी पुन्हा येणार, असं म्हणणार नाही… तर आम्ही आलोय; आमचा रस्ता मोकळा करा”

मुंबई | शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार हॉटेल ग्रँड हयातमध्ये जमा झाले आहेत. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते आणि पक्षप्रमुख उपस्थित आहेत. यावेळी 162 आमदारांसमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं.

सत्तेसाठी वाटेल ती करणारी शक्ती या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गाडणार… मी पुन्हा येणार, असं म्हणणार नाही… तर आम्ही आलो आहोत. आमचा रस्ता मोकळा करा, अशी शिवगर्जना उद्दव ठाकरे यांनी हयातमधून केली.

आपली लढाई सत्तामेवजयतेची नाहीतर सत्यमेव जयतेची आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही हा सोहळा करण्याचं कारण म्हणजे सगळ्या जगाला कळावं की शिवरायांच्या महाराष्ट्रात सत्तापिपासू वृत्ती चालणार नाही. आम्ही ती गाडून टाकणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्ही 162 हून अधिक आहोत, बहुमत महाविकास आघाडीकडे आहे. अल्पमतातील सरकारने राजीनामा द्यावा, असं अशोक चव्हाण म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या-