आता अजित पवारांशी माझा संबंध नाही, मी मरेपर्यंत शरद पवारांसोबत- धनंजय मुंडे

मुंबई | अजित पवारांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय घेतला आहे. आता माझे आणि अजित दादांचे कोणतेही संबंध उरलेले नाहीत. मी पहिल्यापासून पक्षासोबत होतो आणि मरेपर्यंत शरद पवारांसोबत आणि पक्षासोबत राहणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

माझं अजित पवारांवर असलेलं प्रेम वेगळं, मात्र अजित पवार जोपर्यंत पक्षात होते तोपर्यंत माझे त्यांच्याशी संबंध होते. मी राष्ट्रवादीचा एकनिष्ट कार्यकर्ता आहे, असं स्पष्ट करत माझ्या पक्षनिष्ठेवर कोणतीही शंका नको, असंही ते म्हणाले.

शनिवारी सकाळी शपथविधी झाला त्या दिवशी मी दुपारी 1 वाजेपर्यंत झोपलो होतो. त्यामुळं मला शपथविधीबाबत कोणतीही माहिती नव्हती. माझ्या बंगल्यावर सर्व आमदार जमल्याचं मीडियाकडून सांगितलं जात होतं, मात्र मला त्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. मी त्यादिवशी बंगल्यावर नव्हतो, असंही मुंडेंनी यावेळी सांगितलं आहे.

अजित पवारांकडे कोणताही गट नाही. माध्यमांच्या डोक्यातून निघालेल्या या कल्पोकल्पीत कल्पना आहेत. विधीमंडळाच्या पटलावर आम्ही बहुमत मत सिद्ध करू, असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-