एल्गारच्या NIA तपासावर उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | एल्गार परिषदेच्या खटल्याचा तपास एनआयकडे देण्याच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

एल्गार परिषदेचा तपास मी एनआयएकडे दिला नाही तर तो केंद्राने अविश्वास दाखवत आमच्याकडून घेतला, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच केंद्राने राज्य सरकारच्या तपासावर अविश्वास दाखवल्याबद्दल आमची नाराजी आहे, असंही उद्धव म्हणाले.

एल्गार आणि भीमा कोरेगाव हा विषय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिष्ठेचा केला आहे. केंद्र सरकारने राज्याच्या कारभारात हस्तक्षेप करू नये. मात्र केंद्रातलं मोदी सरकारकडून हे होताना दिसत नसल्याची खंत एल्गार परिषदेच्या खटल्याचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर पवारांनी बोलून दाखवली.

दरम्यान, भाजपने राज्य सरकावर वारेमाप आरोप करण्यापेक्षा समजुतदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी असा सल्ला यावेळी उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-तुमच्याही बुडाखाली किती अंधार आहे ते बघा; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर पलटवार

-कोणतीही चौकशी करा… मी घाबरत नाही- देवेंद्र फडणवीस

-त्यांच्यातच संवाद नाही… ते आमच्याशी काय संवाद साधणार??- देवेंद्र फडणवीस

-मराठा तरूणांना नियुक्त्या न मिळणं हे दुर्दैवी- देवेंद्र फडणवीस

-नवी मुंबई निवडणुकीपूर्वी फडणवीसांना धक्का… शिवसेनेसाठी गुडन्युज!