मुख्यमंत्र्यांकडून पालिकेचे स्वतंत्र वीजनिर्मिती केंद्र सुरु करण्यास परवानगी!

मुंबई | मुंबई महानगर पालिकेमार्फ़त लवकरच स्वतंत्र वीजनिर्मिती सुरु करण्याची परवानगी दिली मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकामागोमाग एक असा निर्णयांचा सपाटाच लावल्याचं दिसत आहे.

उद्धव ठाकरे मध्यवैतरणा जलाशय पूर्ण केल्यावर त्यातून मुंबई महानगरपालिकेचे स्वतंत्र विजनिर्मीती केंद्र सुरू करू, असं वचन शिवसेनेनं दिलं होतं. मुबंई महानगरपालिकेच्या 2002 च्या वचननाम्यात शिवसेनेनं हे आश्वासन दिलं होतं.

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयात मुंबई महापालिकेला आपलं स्वतंत्र वीजनिर्मीती केंद्र सुरू करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जलाशयातून ही वीज निर्मिती केली जाईल.

दरम्यान, याबाबतची तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित होऊन त्याच्या निविदा लवकरच उपलब्ध होतील. असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-