मुंबई | पहिल्या बेस्टच्या एनसीएमसी कार्डचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपचा जोरदार समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरून टीका करणाऱ्यांना देखील धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं.
तुम्ही काय केलंत हिंदुत्वासाठी, राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा तुम्ही घेतलेला नाही, राम मंदिरचा आदेश हा कोर्टाने दिला आहे, यांनी तर मंदिर उभारण्यासाठी झोळी पसरली होती, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.
ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे थोतर आहे का? बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.
हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी ? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये, आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलंय.
मास्क सक्ती नसली तरी मास्क मुक्ती अजून झालेली नाही. लवकरात लवकर माझा इरादा आहे जाहिर सभा घ्यायचा. मास्क काढून बोलायचं आहे, अस
सगळ्यांचा एकादा परामार्श सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे, हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, त्यांचा समाचार घ्यावा लागणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
“लाथ मारायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अशी त्यांची वृत्ती…”
मुख्याध्यापक आणि शिक्षिकेचा सेक्स व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ!
भाजपची सर्वात मोठी घोषणा, 26 मे ला देशभर…
मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेत्याला अटक
…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल- नितीन गडकरी