महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरावून देणार नाही- मुख्यमंत्री

नागपूर | नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन केलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला एक विनंती करतोय. संसदेत नागरिकत्त्व कायदा मंजूर झाला आहे. त्या कायद्याबद्दल देशात अशांतता आणि गैरसमज आहे.

देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं होतं आहे. काही ठिकाणी हिंसाचार उसळला आहे. महाराष्ट्रात सुद्धा आंदोलन, मोर्चे निघत आहे. महाराष्ट्रातील जनतेनं मनात कोणतेही गैरसमज करून घेऊ नये. हा कायदा योग्य आहे की नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयात निर्णय होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, काहीही झालं तरीही कायदा झाल्यानंतर आपापल्या देशातून कुणाला हाकलून दिले जाईल, असा गैरसमज करु नका. महाराष्ट्र सरकार हे जनतेचं हित जपण्यात आणि सलोषा कायम राखण्यासाठी समर्थ आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-