कोकणचं नैसर्गिक वैभव जगासमोर आणणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

मुंबई| कोकणचं निसर्ग सौंदर्य जपून त्याचं वैभव जगासमोर आणणार, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. इथला समृद्ध निसर्ग घालवून जर येथे कृत्रिम प्रकल्प आणले तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही. त्यामुळे कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे, तर  कॅलिफोर्नियाला आपला कोकण व्हावं असं वाटलं पाहिजे, असे सांगतानाच एलईडी लाईटद्वारे होणारी मासेमारी रोखण्याकरिता राज्याचा कायदा लवकरात लवकर करण्यात येईल. तसेच पाणबुडीतून समुद्रतळाचे दर्शन, जलदुर्गांची सफर यासारख्या प्रकल्पांतून पर्यटनाचा विस्तार करण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली.

कोकणचा किनारपट्टा म्हणजे पर्यटन. या पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. येथील चिपी विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उपकरणं लावल्यानंतर चाचणी वगैरे होऊन 1 मे या संयुक्त महाराष्ट्र दिनी कोणत्याही परिस्थितीत विमानतळ सुरू करू, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

गोव्यापेक्षा निळाशार समुद्र कोकणाला लाभला आहे. पर्यटकांसाठी ज्या गोष्टी अंडरवॉटर मरीनलाइफ दाखविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. यासाठी पाणबुडीच्या माध्यमातून समुद्र सौंदर्याचे दर्शन लोकांना देण्याची योजना सरकार आखत आहे.

एलिफंटापासून कोकणपर्यंत असलेल्या जलदुर्गांचे दर्शन घडविण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रम्प यांनी दिली तब्बल ‘इतक्या’ निधीला मंजुरी

-अखेर निर्भयाला न्याय मिळणार!; 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता नराधमांना दिली जाणार फाशी

-…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल- देवेंद्र फडणवीस

-ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार

-सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!