कोरोनाच्या प्रतिबंधासाठी ट्रम्प यांनी दिली तब्बल ‘इतक्या’ निधीला मंजुरी

वॉशिंग्टन| कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने तातडीच्या उपाय योजनांना मंजूरी दिली आहे. तातडीच्या उपाय योजनांसाठी 8.3 अब्ज डॉलरच्या निधीला कनिष्ठ सभागृहाने मंजूरी दिली आहे.

कनिष्ठ सभागृहात 415 विरुद्ध 2 मतांनी या संदर्भातील विधेयकाला मंजूरी मिळाली. प्रतिनिधीगृहाने मंजूरी दिल्यावर आता हे विधेयक सिनेटच्या मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

अमेरिकेमध्ये करोना प्रतिबंधक औषधांचे उत्पादन, करोनाच्या निदानासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळांसाठीचा खर्चासाठी 3 अब्ज डॉलर, सार्वजनिक आरोग्याच्या सुविधांवर 2.2 अब्ज डॉलर, वैद्यकीय पुरवठा आणि आरोग्य सुविधेच्या तयारीसाठी 1 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय करोनाची लागण झाल्यामुळे उद्योगांचे जे नुकसान झाले, ते भरून काढण्यासाठी अल्पमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्याची योजनाही आखण्यात आली आहे. त्यामध्ये 1.25 अब्ज डॉलरच्या निधीचा समावेश असणार आहे.अमेरिकेमध्ये 100 पेक्षा अधिक जणांना करोना विषाणूची बाधा झाली आहे. तर 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अखेर निर्भयाला न्याय मिळणार!; 20 मार्च रोजी पहाटे साडे पाच वाजता नराधमांना दिली जाणार फाशी

-…नाहीतर जनता तुम्हाला मिटवून टाकेल- देवेंद्र फडणवीस

-ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प अजित पवार सादर करणार

-सावधान… आणखी एका बँकेवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध; काढता येणार फक्त 50 हजार रूपये!

-13 लाख 85 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले 9 हजार कोटी रूपये; अजित पवारांची माहिती