…मग पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्याला द्यायला अडचण काय???- उद्धव ठाकरे

नागपूर | पंतप्रधान मोदी मंगोलियाला 4 हजार कोटी रुपये देऊ शकतात मग महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे, असा सवाल  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना  केंद्रानं मदत न केल्यास राज्य सरकार स्वतः जबाबादारी घेऊन मदत करंल, असंही सांगितलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवी या मुंबईकरांच्या हक्काच्या आहेत. केंद्र सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी. ते मंगोलियाला 4 हजार कोटी देऊ शकतात तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत द्यायला काय अडचण आहे, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करण्याची घोषणा केली. मंत्रालय मुंबईत आहे त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्याला मुंबईचा हेलपाटा मारावा लागतो, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, लोकांना हेलपाटे मारावे लागू नये म्हणून आमचं सरकार प्रत्येक विभागात मुख्यमंत्री कार्यालय सुरु करेल. जिल्ह्याची कामं त्या त्या विभागात होतील, हेलपाटे वाचतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-