शशी थरुर यांच्याविरोधात अटक वाॅरंट; काय आहे प्रकरण?

तिरूवनंतपूरम | एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अपमान केल्याच्या प्रकरणात काँग्रेस नेेते आणि खासदार शशी थरुर यांच्या विरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे. केरळमधील तिरुवनंतपूरम येथील एका स्थानिक न्यायालयाने हे वाॅरंट जारी केलं आहे.

एका पुस्तकातून हिंदू महिलांचा अपमान केल्याचा शशी थरुर यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती. पण न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसतंय.

न्यायालयाने समन्स बजावला होता, पण कधी उपस्थित रहावं याबाबत कोणता नेमका उल्लेख करण्यात आला नव्हता, अशी माहिती शशी थरुर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, ‘एन एरा ऑफ डार्कनेस’साठी थरुर यांना साहित्य अकादमीने पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. थरुर यांनी लहानपणापासूनच पुस्तक लिहण्यास सुरुवात केली होती. त्यांची दोन डझनहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-