उद्धव ठाकरेंना जोर का झटका; नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीला यांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन कार्याकरणी जाहीर केली. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव पाटील यांची उपनेतेपदी निवडही केली. त्यामुळे आढळराव पाटील हे शिंदे गटात सामील झाल्याचं आता समोर आलंय.

काही दिवसांपूर्वी त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु दोन तासांतच नजरचुकीने बातमी छापली सांगत ‘सामना’ने दिलगिरी व्यक्त केली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना बोलावून घेत त्यांची समजून काढली होती. मात्र याचा काहीही उपयोग झाला नसल्याचं दिसतंय. अखेर आढळराव देखील शिंदे गटात सगभागी झाले आहेत.

दरम्यान, शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याचं वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये छापून आलं होतं. आढळराव पाटलांसाठी तो सर्वांत मोठा धक्का होता.

आढळरावांच्या थेट भूमिकेने नजरचुकीने कारवाई बातमी छापून आल्याचं ‘सामना’ने स्पष्ट केलं. मात्र माझी शिवसेनेत काय किंमत आहे, हे मला आता समजलं आहे. आतमधून मी अस्वस्थ आहे. येत्या काही दिवसांतच पुढच्या निर्णयाबाबत विचार केला जाईल, असं ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

56 वर्षांच्या शिवसेनेच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडलं, एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा निर्णय 

उद्धव ठाकरेंचा कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका बंडखोर आमदारांची हकालपट्टी 

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

 “देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा