56 वर्षांच्या शिवसेनेच्या राजकारणात हे पहिल्यांदाच घडलं, एकनाथ शिंदेंचा आणखी एक मोठा निर्णय

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख पदाला धक्का न लावता एकनाथ शिंदे यांची प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या 14 खासदारांसोबत नुकतीच एकनाथ शिंदे यांची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीनंतर नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

शिवसेना मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुखपदाला मात्र हात लावलेला नाही. आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

आमदार दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. तर नेतेपदी रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची निवड झाली आहे.

उपनेते पदी यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, शरद पोंक्षे, तानाजी सावंत, विजय नहाटा, शिवाजीराव आढळराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेचे नेतेपद बाळासाहेबांनी तयार केले आहे. तसेच शिवसेना हा नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याची अधिकार नाही. याचा सेनेवर फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

उद्धव ठाकरेंचा कारवाईचा सपाटा सुरूच, आणखी एका बंडखोर आमदारांची हकालपट्टी 

एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा 

 “देवाचा आशीर्वाद म्हणून लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”

उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू