मी काय बांगड्या भरल्या नाहीत; उदयनराजे भोसलेंचं मलिकांना प्रत्युत्तर

सातारा | सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतचं होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना मोठा दिलासा मिळाला आहे. उदयनराजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्यावेळी लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

आज उदयनराजे यांनी भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेवर भाष्य केले. याविषयी बोलताना मी लोकशाही मानणारा आहे, माझ्यावर अनेकांनी तोंडसुख घेतलं, काहीही बोलायचंय ते बोलले. मी उगीच इकडं तिकडं गेलो नाही. हसू का रडू तेच मला कळत नाही. आपण एकमेकांचा हात धरू शकतो, पण…. त्यांना योग्य वाटलं ते ते बोलले असं विधान केले आहे.

मानसिक समाधान झालं असेल, नसेल तर अजून बोला. कुणी काय केलं, याचा लेखाजोखा लोकांपुढ मांडतो. मी आतापर्यंत समाजकारण केलं, राजकारण कधीही केलं नाही, असं उदयनराजे भोसले यांनी 

मी आदराने बोलतो, खूप आदर आहे मला त्यांचा. नवाब मलिक हेही बोलले. त्यांच्याबद्दलही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा. मी स्वाभिमान सोडलेला नाही, कुणीपण कायपण बोलायचं. मी ऐकून घ्यायचं. एवढ्या काय मी बांगड्या भरल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या, कुणीपण या समोरासमोर बसा असं विधान उदयनराजे यांनी केले आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेवरही त्यांनी भाष्य केले आहे. मला गाणे आवडते मी लावतो, कॉलर माझीय, चावीन नाहीतर फाडून टाकीन. दुसऱ्याला काय, त्याच्यावरही चर्चा. इश्यूबेस राजकारण करू नका, इश्यूबेस समाजकारण करा’ असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-