अमित शहाजी, राजेंना खासदार करून मंत्री करा; चाहत्याने लिहिलं रक्ताने पत्र

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी दणदणीत पराभव केला. त्यानंतर उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी कार्यकर्ते आता करू लागले आहेत. याचसंबंधी त्यांच्या एका चाहत्याने गृहमंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहिलं आहे.

चाहत्याने अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहित उदयनराजेंना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी केली आहे. साताऱ्यातील निलेश जाधव याने हे पत्र लिहिलं आहे आणि विशेष म्हणजे त्याचा आज वाढदिवस आहे.

पत्रात निलेश लिहितो की-

माननीय श्री.अमित शाहजी (गृहमंत्री भारत सरकार)मी निलेश सुर्यकांत जाधव सांगू इच्छितो की, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना राज्यसभेवर खासदार करुन मंत्रिपद मिळावे आणि छत्रपतीच्या गादीचा सन्मान करावा अशी विनंती करतो. -आपला निलेश जाधव….

दरम्यान, येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यात भाजपच्या कोट्यातून उदयनराजेंची वर्णी लागू शकते, अशी खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजतीये. भाजपचे खासदार अमर साबळे यांचा एप्रिल महिन्यात राज्यसभेचा कार्यकाळ संपतो आहे. त्यांच्याच जागी उदयनराजेंची वर्णी लागू शकते, अशी माहिती समोर येत आहे.

 

Letter Udyanraje

महत्त्वाच्या बातम्या-

-आपले गडकिल्ले ही छत्रपतींची देण…. हेच वैभव जगाला दिमाखात दाखवणार- उद्धव ठाकरे

-धक्कादायक… मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे आई-वडिल अन् भावाने केली आत्महत्या!

-आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय अनुसुचित जाती जमातींवर अन्याय करणारा- आठवले

-ती आपल्याला कायमचं सोडून गेली…; आनंद महिंद्रा यांचं ते ट्वीट व्हायरल