कोश्यारींनी शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या त्यांनी…- उदयनराजे भोसले

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख करत चाणक्याशिवाय चंद्रगुप्तांना कोण विचारेल. समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असं वक्तव्य केलं होतं. यावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

भगतसिंह कोश्यारी यांनी तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे राज्यपालांनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

खासदार उदयनराजे यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असं वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपलं वक्तव्य त्वरित मागे घ्यावं, असं ट्विट उदयनराजे यांनी केलं आहे.

राज्यपालांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी सलग पाच ट्विट करत राज्यपालांना खडेबोल सुनावले आहेत. यात त्यांनी व्हिडीओ आणि कोर्टाच्या निर्णयाची कॉपीही सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. 16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार… ‘तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असं सुप्रिया सुळे यांनी कोर्टाची कागदपत्रं पोस्ट करत म्हटलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

“…त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, मुख्यमंत्री अजून किती दिवस हे सहन करायचं” 

“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी