भिडे गुरुजींना भेटल्यानंतर उदयनराजे म्हणतात…आता राजकारणापासून दूर व्हायचंय”

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयराजे भोसले यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजींची अचानक भेट घेतल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांच्या ‘जलमंदीर’ या निवासस्थानी उदयनराजेंनी त्यांची भेट घेतली.

राजकारणातून दूर व्हायचा विचार करत करत असल्याची खळबळजनक प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे. भाजप प्रवेश आणि राजकाराणीतील नव्या इनिंगबाबत बोलताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

हे काही माझ्या एकट्याचं घर नाही. ज्याप्रमाणे इतर लोक येतात. त्याप्रमाणे संभाजी भिडेही आले होते. संभाजी भिडे आणि माझ्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, भाजप प्रवेशावरुन पुन्हा एकदा थेट भाष्य केलं नाही. ज्या काही चर्चा होत आहेत तसं काहीही नसल्याचं उदयराजेंनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-