निवडणूक आयोगाच्या आधी अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभा निवडणूकीची तारीख

नागपूर : महाराष्ट्रात आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. काही आठवड्यात निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची शक्यता आहे. पण ही घोषणा होण्याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुका केव्हा होतील याबाबत माहिती दिलीय.

विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता 12 सप्टेंबरच्या दरम्यान लागणार असून, 15 ऑक्टोबर दरम्यान निवडणूक होईल. 2014मध्येही याच काळात निवडणूक झाली होती अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. 288 जागांवर तयारी सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळच्या सरकारने तब्बल 25 महत्त्वाचे निर्णय घेतले. आचारसंहिता लागण्याआधी लोकप्रिय निर्णय घेण्यावर सरकारचा भर आहे.

गणेशोत्सवानंतर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जंबो निर्णय घेण्यात आले. सप्टेंबर महिन्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाच्या किमान 3 बैठका होणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या-