मुंबई | हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काउंटर करण्यात आला. यावर ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंबळचे दरोडेखोरही झटपट न्याय द्यायचे पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी केलेला एन्काउंटर अयोग्य आणि कायद्याला धरुन नाही, असं परखड मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
आरोपी पोलिसांकडील बंदूक हिसकावून पळत होते आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं सांगितलं जात आहे. मात्र, यात संशयाला जागा आहे. आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावून घेतली असं घटकाभर गृहित धरलं तरी प्रश्न पडतो की पोलिस एवढे बेसावध आणि निष्काळजी होते का?, असा सवाल निकम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, प्रत्येकाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे तसा पोलिसांनाही आहे. मात्र हा अधिकार कधी वापरायचा याचेही काही निकष आहेत. एखाद्याचा जीव जात असेल तरच तो समोरच्याचा जीव घेऊ शकतो, असं निकम यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं एक आई म्हणून मी समर्थन करते- चित्रा वाघ https://t.co/6tn5ENREn7 @ChitraKWagh
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट! https://t.co/UC1NBan6JH @AjitPawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019
हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर! https://t.co/KLWWN3rBLZ #HaidrabadPolice
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 6, 2019