‘रशियानंतर आता हा देश आमच्यावर हल्ला करणार’; युक्रेनच्या नव्या दाव्यानं खळबळ

नवी दिल्ली | गेल्या 17 दिवसांपासून सुरू असलेलं रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) अनेक चर्चांच्या फेऱ्यानंतरही सुरूच आहे. रशियन सैन्य दिवसेंदिवस युक्रेनला उद्ध्वस्त करत आहे.

युक्रेनमधील काही शहरांवर आता रशियन सैनिकांनी ताबा मिळवला आहे. पण रशियन सैन्याला अद्यापी युक्रेनची राजधानी कीव शहरावर ताबा मिळवता आला नाही.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला कसल्याही परिस्थितीत कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिले आहेत. अशात नवीन माहिती समोर येत आहे.

कीव शहरावर आता रशिया तिन्ही दलांच्या माध्यमातून हल्ला करण्याची तयारी करत आहे. रशियन सैन्य कीवच्या दोन्ही बाजूंना लाखोंच्या संख्येनं धडकलं आहे.

रशियाचा मित्र देश बेलारूस युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं आहे. रात्री 9 च्या सुमारास बेलारूसचं सैन्य युक्रेनवर हल्ला करणार आहे, असं युक्रेननं म्हटलं आहे.

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान बेलारूसकडून दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं होतं. रशियानं या अगोदरच बेलारूसच्या हद्दीतून युक्रेनवर हल्ला केला आहे.

युक्रेननं बेलारूस हल्ला करणार असल्याचं सांगितल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. कारण आत्तापर्यंत दोन देशांमध्ये असणारं हे युद्ध अनेक देशांमध्ये पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्याला कीव शहरावर ताबा मिळवण्याचे आदेश दिल्यानंतर रशियन सैन्य हल्ला करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

करदात्यांना मोठा दिलासा, निर्मला सितारमण यांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आई हिराबेन यांची भेट; जेवतानाचे फोटो व्हायरल 

Russia-Ukraine War | पुतिन यांनी 70 वर्षांचा ‘हा’ रेकॉर्ड मोडला 

मुंबईतल्या जोडप्याचा खुल्लम-खुल्ला रोमान्स; स्टेशनवर KISS करतानाचा व्हिडीओ तूफान व्हायरल 

“…तर उद्याच राजीनामा देतो, मला मंत्रिपदाने फरक पडत नाही”