मुंबई | बंडखोरी नाट्य, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ, त्यानंतर बहुमत चाचणीवेळीही शिवसेनेला आपले वर्चस्व सिद्ध करता आले नव्हते. त्यामुळे राणे पिता पुत्रांकडून शिवसेनेवर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
शिवसेनेचे सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी गप्प बसून आराम करावं, असा सल्ला नारायण राणे यांनी ठाकरे आणि राऊत यांना दिला आहे.
शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही, असं राणे म्हणालेत.
संजय राऊत यांनी काही तरी गुन्हा केला असणार म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तसेच संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असा जहरी टीकाही राणेंनी संजय राऊत यांच्यावर केली.
राणे पिता पुत्रांकडून शिवसेनेवर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या-
शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक मोठा दणका!
महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी; निवडणूक आयोगाने केली महत्त्वाची घोषणा
“उद्धव ठाकरे हे आमचं दैवत पण आमच्या दैवताला मातोश्रीबाहेर काढून चूक झाली”
“एकनाथ शिंदेंना आम्ही असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही”