शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक मोठा दणका!

मुंबई | एकापाठोपाठ एक हजारो कोटींचे जीआर ठाकरे सरकारकडून दोन दिवसात काढण्यात आले. या काढलेल्या जीआरचा आकडा जवळपास सहा हजार कोटींच्या पुढे गेला होता. मात्र आता एकनाथ शिंदे सरकार (Eknath Shinde) आल्यानंतर त्यांनी तात्काळ या काढलेल्या जीआरला ब्रेक दिलाय.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयांवर पाणी फिरलं आहे. यातल्या जास्तीत जास्त निविदा या जलसंधारण विभागातील असल्याचे सांगण्यात आलं आहे.

जी काम सुरू झाली नाहीत, त्या सर्व जीआरना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आलाय. त्यामुळे हा महाविकास आघाडी सरकारसाठी सर्वात मोठा झटका मानला जात आहे

फडणवीसांनीही दुसऱ्या बाजूने निर्णयांचा धडाका लावला आहे. ठाकरे सरकारने आरे येथील कारखेडला स्थिती दिले होती. ते कारखेड कांजूरमार्गला नेण्याचा प्लान ठाकरे सरकारने अखला होता. पण ती जागा वादात सापडल्यामुळे त्या जागेवरती ही कारशेड सुरू होऊ शकलं नव्हतं.

तर दुसरीकडे आरे येथील कारशेडचं काम हे 25% पूर्ण झालं आहे. असा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत होता. भाजपचं सरकार येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला निर्णय घेतला, तो मेट्रोचं कारशेड पुन्हा आरे मध्ये नेण्याचा, त्यामुळे गेल्या सरकारने घेतलेल्या निर्णयांना ब्रेक लावण्याचं काम हे सरकार सध्या करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी; निवडणूक आयोगाने केली महत्त्वाची घोषणा 

“उद्धव ठाकरे हे आमचं दैवत पण आमच्या दैवताला मातोश्रीबाहेर काढून चूक झाली”

“एकनाथ शिंदेंना आम्ही असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही” 

मोठी बातमी! शिदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी 

मोठी बातमी! संजय राऊतांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका