“भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडरपण आहे”

जालना : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वॉशिंग पावडरवरुन कलगीतुरा रंगलेलं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही उडी घेतली आहे. भाजपकडे वॉशिंग मशिन आणि गुजरातची निरमा पावडर आहे, असं म्हणत दानवेंनी विरोधकांना चपराक लगावली.

भाजप आणि विरोधकांमध्ये सध्या ‘धुलाई युद्ध’ रंगलं आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भाजपकडे वॉशिंग मशिन आहे. कोणालाही पक्षात घेण्याआधी आम्ही त्यांना मशिनमध्ये धुवून घेतो. आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी विरोधकांना उत्तर दिलं.

‘गुजरातची निरमा पावडर’ असा साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख दानवेंनी केला होता. रावसाहेब दानवे जालन्यामध्ये बोलत होते.

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची फिरकी घेतली होती. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबावतंत्रासाठी वापर सुरु आहे. आमच्याकडे असताना वाईट असलेले, त्यांच्याकडे गेल्यावर चांगले होतात, भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल त्यांनी विचारला होता.

महत्वाच्या बातम्या-