“देशात नरेंद्र मोदी नावाचा आजार पसरलाय”

औरंगाबाद | देशात मोदी नावाचा आजार पसरला आहे. देशातील चौकाचौकात, प्रत्येक रस्त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. इतक्या मोठया प्रमाणात भाजपकडे पैसा आला कुठून, असा सवाल दलित अधिकार मंचचे अध्यक्ष जिग्नेश मेवानी यांनी केला आहे.

देशात भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षही प्रबळ नाही, अशा स्थितीमध्ये सर्व विरोधकांनी एकत्र आलं तरच भाजपला रोखणं शक्य आहे, असं मोवानी यांनी म्हटलं आहे.

आपण सर्वांनी मिळून भाजपला रोखण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. यासाठी सर्वांना व्यक्तिगत स्वार्थ सोडावा लागेल. आपल्याला राजकीय धोरण ठरवावं लागणार असून, यासाठी दबाव वाढवण्याची गरज आहे, असं जिग्नेश मेवानी यांनी सांगितलं आहे.

आपली ही लढाई आत्मसन्मान आणि संसाधनांसाठीची आहे. देशातील 60 टक्क्यांपेक्षा अधिक दलित वर्ग हा झोपडपट्टीत राहून शेजमजुरी आणि कारखान्यात राबत आहे. दलित आंदोलन हे मजुरांचे आंदोलन आहे. यासाठी दलित पँथर सारखा निस्वार्थी लढा द्यावा लागेल, असंही मेवानी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-