अविवाहित जोडप्याने हाॅटेलमध्ये एकत्र राहणं गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

चेन्नई | अविवाहित जोडप्याने हाॅटेलमध्ये एकत्र राहणं गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अविवाहित जोडप्याला खोली नाकारणाऱ्या हॉटेलमालकांना या निर्णयामुळे मोठा दणका बसला आहे.

दोन सज्ञान व्यक्ती जर स्वत:च्या मर्जीने लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असतील तर ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष हॉटेलमध्ये राहणार असतील तर तो गुन्हा ठरत नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

अविवाहित जोडप्याला खोली देणं हे अनैतिक असल्याचं न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिपोर्टसमध्ये म्हणण्यात आलं होतं. मात्र, अविवाहितांना खोली दिल्यानं कायद्याचं उल्लंघन होतं, असं सरकारी पक्ष न्यायालयाला पटवून देऊ शकला नाही.

दरम्यान, सर्व्हिस अपार्टमेंटला सील ठोकताना आपली बाजू ऐकून न घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्याने याचिकेत केला होता. संबंधित पथकाने कोणतीही नोटीस न देता परिसर सील केला होता, असं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-