चीनला झटका, भारतानंतर अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी

वॉशिंग्टन | भारतात 30 जूनला टिकटॉकसह अजून  58 चीनीअ‌ॅपवर पुर्णपणे बंदी घातली होती. सध्या बाकी इतर देशातूनही टिकटॉक बंद करण्याची मागणी होत आहे. अशातच अमिरिकेत ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वी-चॅट या कंपन्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहारांवरदेखील निर्बंध घालण्यात आले आहेत.

दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट किंवा इतर कोणत्याही कंपनीच्या हा व्यवसाय खरेदी न करण्याच्या शक्यतेकडे पाहता त्यांनी देशात टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी 15 सप्टेंबरची मुदत दिली आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीदेखील केली आहे.

टिकटॉकसारख्या अविश्वासू अॅपद्वारे डेटा जमवला जाणं हे देशाच्या सुरक्षेविरोधात आहे, असं ट्रम्प यांनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटलं आहे.

दरम्यान, डेटा मिळवल्यामुळे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला अमेरिकेतील लोकांच्या खासगी आणि मालकीची माहिती मिळते. यामुळे चीन अमेरिकेतील फेडरल कर्मचारी आणि कंत्राटदारांच्या ठिकाणांचा मागोवा घेऊ शकते. इतकंच नाही तर कम्युनिस्ट पक्ष खासगी माहितीचा वापर करून धोका निर्माण करू शकतो आणि कॉर्पोरेट हेरगिरीदेखील करू शकतो, असंही ट्रम्प यांनी सांगितलं.

 

महत्वाच्या बातम्या-

काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही- संजय राऊत

महानायक अमिताभ यांनी लेखकाची मागितली माफी; मी चुकलो..

कोरोनामुळे सर्व मंडळांनी यावर्षी देखावे आणि मिरवणुक टाळाव्यात; पुण्याच्या महापौरांचं आवाहन

“राज्य सरकारने मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करावी, पाणी येण्याआधी नालेसफाई केली की हातसफाई?”

‘चंद्रकांत पाटील म्हणजे विरोधकांना जीवनातून उठवणारे’; राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचं पाटलांवर टीकास्त्र