व्हॅलेंटाईन वीक! Rose Day का साजरा केला जातो?; जाणून घ्या इतिहास

मुंबई | वर्षभरात मनात दाटलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचा महत्त्वाचा आठवडा म्हणून सर्व प्रेमी व्हॅलेंटाईन वीकची वाट पहात असतात. फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा क्षण या आठवड्यात येतो.

प्रेम म्हणजे दोन मनातील एकमेकांच्या आयुष्याला कलाटणी देणारा शब्द आहे. प्रेमाचा ऋतू म्हणूनही फेब्रुवारीला ओळखण्यात येतं. फेब्रुवारीत सर्वत्र थंडीचा मोसम चालू असताना प्रेमाचा अंकूर फुटत असतो.

प्रेमाची भावना व्यक्त करण्याची सुरूवात रोज डे पासून होते. प्रेमाची भावना आपल्या खास शब्दात मांडण्याअगोदर एकमेकांबद्दल एक बंधन तयार होत असतं. परिणामी या आठवड्यातील पहिल्या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे.

7 फेब्रुवारीला दरवर्षी रोज डे साजरा करण्यात येतो. या दिवशी पिवळ्या, गुलाबी, पांढरा, लाल अशा विविध रंगांच्या गुलाबाच्या फुलांनी प्रेमाच्या प्रवासाला सुरूवात होते. परिणामी बाजारही या दिवशी प्रेमात न्हाऊन निघतो.

रोज हे प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो. या दिवशी प्रेमी एकमेकांना गुलाब देऊन एकमेकांबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करतात. परिणामी प्रेमी लोकांच्या मनात या दिवसाचं महत्त्व खूप आहे.

मुगल बेगम नुरजहाॅं यांना गुलाब खूप प्रिय होता म्हणून त्याचे पती दररोज टनभर गुलाबाचे फुलं राणीच्या राजवाड्यात सेवकांच्या हाती वाट लावायचे. परिणामी प्रेमाची भावना व्यक्त करण्याचं गुलाब एक माध्यम बनलं आहे.

महाराणी व्हिक्टोरिया यांना देखील गुलाब खूप प्रिय होता. महाराणी व्हिक्टोरीया यांच्या काळात लोकांनी गुलाब आदान-प्रदान करण्याची परंपरा सुरू केली आहे. व्हिक्टोरिया आणि रोमन एकमेकांना गुलाब देऊन भावना व्यक्त करत होते, असं देखील म्हटलं जातं.

लाल गुलाब ही प्रेमाची निशाणी मानली जाते. पांढरा गुलाब शांतीचं प्रतिक मानलं जातं. पिवळा गुलाब हा मैत्रीचं प्रतिक मानलं जातं. पिंक गुलाब हा आपल्या आई-वडीलांना देण्यात येतो कृतज्ञता म्हणून त्याचा उपयोग होतो.

ऑरेंज गुलाब प्रेमातील उत्साहाची निशाणी मानली जाते. अशाप्रकारे प्रत्येक गुलाब हा एक वेगळा संदेश देतो. प्रेमाच्या आठवड्याची धमाकेदार आणि आनंददायी सुरूवात करण्यात गुलाबाच खूप मोठा वाटा आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; पंजाबमध्ये धक्कादायक प्रकार घडला

“लतादीदी राजकारणी नव्हत्या, आता स्मारकावरून राजकारण करू नका”

शाहरूखला ट्रोल करणाऱ्यांना ऊर्मिला मार्तोंडकरने सुनावलं, मोदींचा ‘तो’ फोटो केला शेअर 

दमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी; सुप्रिया-शरद पवारांचा हा फोटो ‘का’ होतोय व्हायरल? 

लता मंगेशकरांना विष देऊन मारायचा प्रयत्न झालेला?, नेमका काय प्रकार घडला होता?