प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr Prakash baba Amte) यांना कर्करोगाचं निदान झाल्याची बातमी समोर आली आहे. 74 वर्षीय प्रकाश आमटेंवर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं कळतंय.

प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांचे पुत्र आहेत. डिसेंबर 1973 पासून ते पत्‍नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात. लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

कोणीही फोन करून कुटुंबीयांना त्रास न देण्याची विनंती सुपुत्र अनिकेत आणि इतर सदस्यांनी केली आहे. आजाराचे निदान करण्यासाठी तपासण्या आणि उपचार सुरु असून उपचारांना ते प्रतिसादही देत आहेत. सध्या डॅाक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डॅा. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

डॉक्टर प्रकाश आमटे हे 8 जून रोजी पुणे येथे बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचार व तपासण्या सुरू आहेत व पूर्ण विश्रांतीचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे, असं अनिकेत आमटे म्हणालेत.

काही महिन्यांपूर्वी प्रकाश आमटेंना कोरोनाचीही लागण झाली होती. त्यावेळी त्यांच्यावर नागपुरातील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

महत्त्वाच्याबा बातम्या-  

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर 

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील” 

टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी 

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद, वाचा सविस्तर

“घर मे बैठा नकली, अयोध्या जा रहा है असली”