निवडणूक आयोग राजकारण्यांना मोठा झटका देण्याच्या तयारीत!

नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगानं सध्याच्या निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये दोन मतदारासंघातून निवडणूक लढवण्यावर बंदी आणण्याची शिफारस करण्यात आली आहे.

आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करणे, ओपिनियन पोल, एक्झिट पोलवर बंदी, दोन मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याबाबतच्या प्रस्तावासोबत सहा शिफारशी केंद्र सरकारकडे पाठवल्या आहेत.

भारतीय निवडणूक आयोगानं कायदा मंत्रालयाला मतदार ओळखपत्र आणि आणि आधार कार्ड लिंक करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे.

केंद्र सरकारनं ही शिफारस मान्य केल्यास एका उमेदवाराला एका पेक्षा अधिक मतदारसंघातून निवडणूक लढवता येणार नाही. 2004 मध्ये देखील यासंदर्भातील प्रस्ताव निवडणूक आयोगानं मांडला होता.

भारतीय निवडणूक आयोगानं एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलवर देखील बंदी घालण्याची मागणी केली होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत ओपिनियन पोल जाहीर करण्यास बंदी घालावी, अशी सूचना देखील निवडणूक आयोगानं केल्याचं कळतंय.

महत्त्वाच्याबा बातम्या-   

प्रकाश आमटे यांच्या तब्येतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर 

बिटकॅाईनमध्ये गुंतवणूक केलेले देशोधडीला लागले, झटक्यात पोहोचला इतक्या रुपयांवर 

“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील” 

टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी 

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद, वाचा सविस्तर