अभिनेत्री विद्या बालननं कोरोनाच्या लढ्यात केलेली मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल!

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार मदतीला धावून येत आहेत. यामध्ये अभिनेत्री विद्या बालननं केलेली मदत ऐकून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल.
कोरोना विरूद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी विद्या बालनने मोठी रक्कम जमा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात तिने माहिती दिली.

विद्या बालनने गरजुंच्या मदतीसाठी फंड गोळा केला आहे. मी फार आनंदी आहे की, मी डॉक्टरांसाठी 2500 हून अधिक पीपीई किट्स आणि 16 लाख रूपयांचा मदतनिधी गोळा केला आहे, असं विद्या बालननं सांगितलं आहे.

विद्या बालनने सेलिब्रिटी शाउट-आउट प्लेटफॉर्म ट्रिंग, दृष्यम फिल्मचे मनीष मुंद्रा आणि चित्रपट-निर्माते अतुल कास्बेकर यांच्यासोबत एकत्र येऊन हा मदतनिधी गोळा केला आहे.

मला आज सकाळी एका चांगल्या बातमीमुळे जाग आली. आम्ही 2500 पीपीई किट्सपर्यंत पोहोचलो आहोत तसेच काही तासांतच 16 लाखांहून अधिक रूपये एकत्र करण्यात आले आहेत. तुमच्यापैकी प्रत्येकाने जे दान केलं आहे, त्यातूनच हे शक्य झालं. तुम्हा सर्वांना खरंच खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना अनेक आशीर्वाद. हीच खरी भारताची एकता आणि भावना आहे, असं विद्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

-महाराष्ट्र शासन कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलीस कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे – गृहमंत्री

-वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

-3 मे नंतर लॉकडाउनचं काय?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…

-‘महाराष्ट्राला अतिरिक्त एक लाख कोटी द्या’; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र