“सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही, सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीला आमचा विरोध कायम आहे”

नागपूर | सत्ता गेली तरी चालेल पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध कायम आहे, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. सावरकरांबाबतची भूमिका संजय राऊतांना लखलाभ, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना नेतेे संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना समज द्यावी, असंही वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

भविष्यात संजय राऊतांनी बोलताना काळजी घ्यावी. संजय राऊत यांच्या वक्तव्याबाबत येत्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विचारधारेच्याबाबतीत काँग्रेसची फरफट होऊ देणार नाही. आम्हाला सत्ता नाही विचारधारा महत्वाची आहे, असंही वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

-“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

-“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी

-पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे