“हिंदू म्हणून घ्यायचं नसेल त्यांनी खुशाल दुसऱ्या देशात निघून जावं”

मुंबई | प्रत्येक दाम्पत्याला दोन मुलं असावित असं संघाचं मत असल्याची चुकीची माहिती पसरवली गेली. लोकसंख्येचा प्रश्न इतर देशांप्रमाणे आपल्याकडेही आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर विचार व्हायला हवा, असं संघाचं मत होतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमात ते भाषण करताना बोलत होते.

दरम्यान, ज्यांना हिंदू म्हणून घ्यायचं नसेल त्यांनी खुशाल दुसऱ्या देशात निघून जावं. भारतात अनेक भाषा, अनेक धर्म आणि अनेक देव – देवता आहेत. पण या वैविध्यामध्येही आम्ही एक आहोत, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

वास्तविक मुलं किती असावित याबाबतीत सरकारनं निर्णय घ्यावा, संघाने नाही, असं भागवत यांनी म्हटलं आहे. याआधी भागवत यांनी दोन मुलं असणं हा कायदा काढणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र आपण त्याबाबतीत कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.

भारत केवळ एक जमिनीचा तुकडा नाही. तो एक स्वभाव आहे. एक प्रवृत्ती आहे. हा देश जर फक्त जमिनीचा तुकडा असता तर त्याचे नाव केव्हाच बदललं असतं, असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी

पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे