पुण्यात पूरस्थिती असताना पालकमंत्री मात्र जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीत व्यस्त!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक ठिकाणी एनडीआरएफचे जवान लोकांना वाचविण्याचे प्रयत्न करत आहेत. पुण्यात इतकी भयंकर स्थिती असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री दिल्लीला युतीच्या बैठकीसाठी गेलेले आहेत, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सरकारला पूरस्थितीचं गांभीर्य नाही. या सरकारचा कारभार रामभरोसे चालला आहे. लोकांच्या प्रश्नांची यांना काही देणंघेणं नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

पुण्यात पूरामुळे माणसं मेली तरी भाजपचे मंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. कोल्हापूर-सांगली येथे पूर आला होता त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत मग्न होते तर आता पुण्यात पूर आलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीला युतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी गेलेत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी घटनास्थळी असणं गरजेचे होते. मात्र निवडणूक महत्वाची असल्याने जनतेकडे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारला जनतेचं कोणतंही सोयरसुतक नाही, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. पावसाने पुणे शहराला अक्षरशः झोडपून काढलं.

महत्वाच्या बातम्या-