“सत्ता गेली तरी चालेल पण विचारांशी तडजोड करणार नाही; सावकरांविषयीची भूमिका सेनेला लखलाभ”

मुंबई |  शिवसेना सातत्याने स्वातंत्र्यवीर सावकरांच्या विचारांचा पुरस्कार करत आलीये. त्यांना भारतरत्न दिला जावा, अशी मागणीही शिवसेना गेले काही वर्ष करत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनेकदा पक्षाच्या वतीने बाजू मांडलीये. मात्र राऊतांची भूमिका त्यांना लखलाभ असो. सत्ता गेली तरी चालेल मात्र विचारांशी तडजोड केली जाणार नाही, असं काँग्रेस नेते मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध आहे. सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. शिवसेनेच्या सावरकरांबाबतच्या भूमिकेला आमचा कायमच विरोध आहे आणि राहिन, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना चांगल्या प्रकारे समज द्यावी, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत. तसंच भविष्यात अशी वक्तव्य करताना राऊत यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देखील वडेट्टीवारांनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस कायमच आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आली आहे. मात्र आज काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यासाठीचा त्याग मोठा आहे. त्यांचं स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान विसरता येणार नाही, असं वक्तव्य केलं आहे. एकंदरितच दलवाई यांनी सावकरांविषयीच्या मांडलेल्या भूमिकेवर आता वरिष्ठ काँग्रेस नेत्यांचं काय मतं आहे? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अर्थव्यवस्था उध्वस्त करायला देखील डोकं लागतं; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

-शरद पवारांमुळे बहुजन समाजाचे सरकार आले- शाहू महाराज

-काँग्रेस पलटलं… दलवाईंनी राहुल गांधींना तोंडावर पाडलं; म्हणतात, सावरकरांचा स्वातंत्र्यासाठीचा त्याग मोठा

-पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? अजित पवार यांचं खास शैलीत उत्तर

-तुम्ही इथले प्रमुख… मी तुम्हाला स्वत: खुर्चीत बसवलंय; मुख्यमंत्र्यांच्या आदराने तहसीलदार भारावले