ओबीसी आरक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मुंबई | उद्या ओबीसी आरक्षण गेलं तर ठाकरे सरकारला जबाबदार ठरवू नये. गेले तर सगळ्या राज्यातील ओबीसींचं आरक्षण जाईल, अशी भीती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी व्यक्त केली आहे.

राज्याने केलेला कायदा इम्पिलिमेंट होणं आवश्यक होतं. कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होण्यात आम्हाला यश मिळालं नाही. इथे सुद्धा यश मिळालं नाही. खरंतर इम्पिकल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला दुसरं कोणतंही काम दिलं नव्हतं. या आयोगाला केवळ आणि केवळ डेटा गोळा करण्यासाठी काम दिलं होतं. त्याच्यापलिकडे काम दिलं नाही, आयोग नेमत असताना गोंधळ झाला असं म्हटलं गेलं. त्यात काही तथ्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

आम्ही केवळ आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाला नेमायचं याची मागणी करतो. उच्च न्यायालय आयोगाच्या अध्यक्षाचं नाव पाठवतं. कोणतं नाव त्यांनी पाठवावं हा अधिकार कोर्टाचा असतो. आमची चॉईस नसते. त्यांनी नाव दिलं. बाकीच्या नेमणूक आयोगाने नियमानुसार केल्या. त्यात माजी निवृत्त न्यायाधीश, हायकोर्टातील वकील, प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यात राजकीय पदावर काम करणारा एकही व्यक्ती नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ओबीसी आरक्षणाबाबतचा न्यायालयाचा निकाल वेदनादायी आहे. ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारा हा निकाल आहे. ओबीसी आरक्षण कसे वाचेल यावर विधानसभेत चर्चा व्हायला हवी होती. पण याचे राजकारण झालं, असं वडेट्टीवार म्हणाले.

ओबीसी मंत्री म्हणून माझीच ही जबाबदारी होती हे काहींनी सांगितलं. ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ग्रामीण विभाग, शहर विभाग, वित्त विभाग, न्याय विभाग सांभाळत आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही. पण काही लोकांचा गैरसमज झाला आहे, असंही ते म्हणाले.

पंतप्रधान महोदय आम्हाला न्याय द्या ही मागणी ही आम्ही करणार आहोत. इम्पिरिकल डेटा कोरोना असल्याने गोळा करता आला नाही. कोरोना काळात माणसं वाचवणं गरजेचं होतं. 2 वर्ष जग थांबलं होतं. अशावेळी कुठून इम्पिरिकल डेटा गोळा करता येईल? मध्यप्रदेशात ओबीसींचा कायदा कसा टिकला? तसा कायदा करण्याची आमची तयारी आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या- 

तब्बल 9 वर्षांनंतर श्रीसंतला विकेट मिळाली, मैदानावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ 

रशियामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव न घेता भारतावर टीका

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता

 धोनीनं केलं ट्रॅफिक जॅम! भर रस्त्यात उभी केली बस अन्…; पाहा व्हिडीओ

“भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ राज्याच्या कानाकोपऱ्यात राबवा”