भाई, जाट हूॅं अंधभक्त नहीं; ट्रोल करणाऱ्याला विजेंदर कुमारचा पंच!

नवी दिल्ली | काही दिवसांपुर्वी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काही अज्ञातांनी घुसून विद्यापीठातील विद्यार्थांना मारहाण केली होती. यावर भारतीय संघाचा बॉक्सर विजेंदर सिंहने विद्यार्थांना पाठिंबा दर्शवणारं ट्विट केलं होतं. या ट्विवरून ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला विजेंदरनं सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

तू फक्त बॉक्सिंगकडे लक्ष दे. या फालतुच्या लफड्यांमध्ये कशाला अडकतोस, एक खेळाडू म्हणून तु आम्हाला आवडतोस, अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली होती. यावर जाट हूँ अंधभक्त नही !, असं म्हणत विजेंदरनं नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराने देशात प्रचंड संतापाची लाट उसळळी होती. अनेक राज्यातील संघटनांनी या झालेल्या हिंसेच्या विरोधात मोर्चे काढले होेते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील कार्यकर्त्यांनी ही हिंसा केल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थांनी केला आहे.

दरम्यान, 5 जानेवारीला झालेल्या हिंसेची चौकशी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत उपाय सुचवण्यासाठी विद्यापीठाने पाच सदस्यांची एक समिती स्थापन केली असल्याचं, कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी सांगितलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या-