नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य!

मुंबई | राष्ट्रीय नागरिक नोंदणी किंवा सुधारित नागरिकत्व सारखा कायदा जनतेसाठी घातक असेल तर कायद्याचा पुनर्विचार करा, असं मोठं वक्तव्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सरकार कोणाचंही असेल त्याने जनतेसाठी कायदा करायला हवा. अशा कायद्यांमुळे जर जनतेमध्ये भीती पसरत असेल तर सरकारने त्याचा पुनर्विचार करायला हवा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात शांती यात्रा काढण्यात आली त्याचे स्वागत आपण करायला हवं. निरपराध लोकांना याचा त्रास होत असेल तर कायदा रद्द व्हायला हवा, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारताला न परवडणारा हा विषय आहे. भारताची ओळख विविधतेत एकता अशी आहे. मात्र अध्यक्षांना धमकी आणि जाती पाती राजकारण असं होत असेल तर त्याचा निषेध जितका जास्त करावा तो कमी आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-