सॅक्रेड गेम्सचा दिग्ददर्शक राहुल गांधींना म्हणतो…

नवी दिल्ली | जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून आंदोलनं केली जात आहे.  यावरून  राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. त्यावर सॅक्रेड गेम्सचा दिग्ददर्शक विक्रमादित्य मोटवानी राहुल गांधींना खरमरीत टोला लगावला आहे.

राहुल गांधी यांचं ट्विट रिट्विट करीत सॅक्रेड गेम्सचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीनं राहुल गांधींचा खडेबोल सुनावले आहे. भावा, तू कुठे आहेस?, असा उपरोधिक सवाल करत  विक्रमादित्य मोटवानीनं राहुल गांधींवर टीका केली आहे.

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हल्ल्यानंतर राहुल गांधी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर होते. तर जेएनयूतील घटनेनंतरही राहुल गांधी कुठेही दिसले नाही. त्यामुळे विक्रमादित्य मोटवानी यांने असा प्रश्न केला आहे.

दरम्यान, मोदी-शहा यांचं सरकार लोकांच्या विरोधात आहे. कामगार विरोधी धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. सरकार कंपन्या मोडकळीस आणून त्यांचे मित्र असलेल्या उद्योगपतींना विकत आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-