वीनाचं शिवला वाढदिवसाआधीच गोड गिफ्ट!

मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 2 चे लव्ह बर्ड्स शिव ठाकरे आणि वीना जगताप घराबाहेर तर आलेत पण त्यांची केमिस्ट्री मात्र अजूनही तशीच आहे. दोघांची लव्हस्टोरी बिग बॉस घरात सुरु झाली आणि बघता-बघत दोघंही फारंच सीरियस झाले. या नात्यात एक पाऊल पुढे जात वीणाने शिवला खास सरप्राईज दिलं आहे.

येत्या 9 सप्टेंबरला शिवचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या आधीच वीनाने त्याला एक गोड सरप्राईज दिलं आहे. अ‌ॅडवान्स बर्थडे गिफ्ट म्हणून वीनाने शिवच्या नावाचा टॅटू हातावर काढला आहे.

शिवने वीनाचा टॅटू जसा काढलाय तसाच आणि त्याच जागेवर वीणाने स्वतःच्या हातावर शिवच्या नावाचा टॅटू काढला आहे.

शिव आणि वीणा घरात असताना वीनाला कॅप्टन करण्यासाठीच्या एका टास्कमध्ये शिवने खूप मोठी गोष्ट केली होती. वीणाला जिंकवण्यासाठी शिवने चक्क त्याच्या हातावर वीणाच्या नावाचा परमनंट टॅटू काढला होता.

दरम्यान, वीना आणि शिव ही दोघंही एकमेकांसाठी सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकून व्यक्त होतात. दोघांचं नातं फारंच घट्ट आहे असं यावरुन दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-