नवी दिल्ली | शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पुन्हा एकदा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं आहे. विनायक राऊत यांनी आज नितीन गडकरींची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राऊतांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
नारायण राणेंच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. त्यांची कुंडली आमच्याकडे आहे. वेळ आल्यास राणेंची कुंडलीच बाहेर काढू, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.
प्रहारमध्ये काय छापून येणार ते बघू. पण ते स्वतः चिखलात बुडालेले आहेत, असं सांगतानाच आम्हीही राणेंचा रक्तरंजित इतिहास बाहेर काढू, असा इशारा राऊत यांनी दिला.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचंही विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे.
तपास यंत्रणांनी आपलं काम करावं. पण काम करत असताना दबावाखाली करू नये. तपास करताना प्रसिद्धीचा स्टंट केला जातो. तपास यंत्रणांनी घाबरवण्याचं काम करू नये हे नरेंद्र मोदींचं मत योग्यच आहे, असंही विनायक राऊत यांनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या-
“राज्याच्या मुख्यमंत्र्याचं काम शरद पवार करतात”
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ सर्वांना बोनस मिळणार
“मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मेलो तरी त्यांना सोडणार नाही”
“अजितदादांना म्हटलं परवानगी द्या, त्या सोमय्याला बघून घेतो”
“देगलूरमध्ये भाजपला आघाडी द्या आणि जेवण घ्या”