भाजप नेते विनोद तावडे यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले….

मुंबई | भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचं आहे. एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्याच्या नादात आपण जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिसांवर अविश्वास दाखवतो. त्यांचं मनोबल आपण तोडतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांच्याकडून अश्या राजकारणाची अजितबातही अपेक्षा नाही, असं ते म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 2 पानांचं पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये भीमा कोरेगाव प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी तत्कालिन फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

शरद पवार यांच्या पत्राची दखल घेऊन कारवाई करण्याअगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांना बोलवून विचारणा करावी. केसरकरांनी पाहिलेले पुरावे उद्धव ठाकरेंनी देखील पाहावेत आणि नंतरच कारवाई करावी, असंही तावडे म्हणाले आहेत.

दरम्यान, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली. फडणवीस सरकारचे मुख्य उद्देश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबणे आणि लोकशाही आंदोलन अयशस्वी करणे हे होते, असं पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होणार नाही म्हणून काम करेल; जयंत पाटलांच्या हळव्या मनाचं दर्शन

-राज ठाकरेंना शिंगावर घ्यायला आम्ही घाबरत नाही; इम्तियाज जलीलांचा एल्गार

-मोदींनी शरद पवारांची सुरक्षा हटवताच रोहित पवार भडकले; म्हणाले…

-रूप बदलणाऱ्या राज ठाकरेंवर काँग्रेसचा पहिला वार!

…त्यासाठी मी मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे; राज यांचं मोठं वक्तव्य