सेक्स करताना कंडोम वापर म्हणणाऱ्या महिलेची इसमाकडून गळा दाबून हत्या!

मुंबई |  सेक्स वर्करशी संबंध ठेवताना इसमाला कंडोम वापर म्हणणाऱ्या महिलेचा एका इसमाने गळा दाबून हत्या केली आहे. महिलेने व्यक्तीकडे सेफ सेक्सची मागणी केली. परंतू कंडोम वापरण्यास सांगितल्याने इसमाला राग अनावर झाला. आणि त्याने महिलेची गळा दाबून हत्या केली.

बंगळुरूमधल्या राजीनगरमधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सगळा प्रकार मृत महिलेच्या घरीच घडला आहे. याप्रकरणी आरोपी मुकुंद एच.एच. याला पोलिसांनी अटक केली आहे.

बंगळुरूमधील इलेक्ट्रॉनिक सिटीत मुकुंद राहत असल्याचं समजत आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.

मृत महिला तिच्या मुलासह घरी राहत होती. मुलाने आईच्या हत्येची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपीचा शोध घेतला.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप नेते विनोद तावडे यांचा शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले….

-व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होणार नाही म्हणून काम करेल; जयंत पाटलांच्या हळव्या मनाचं दर्शन

-राज ठाकरेंना शिंगावर घ्यायला आम्ही घाबरत नाही; इम्तियाज जलीलांचा एल्गार

-मोदींनी शरद पवारांची सुरक्षा हटवताच रोहित पवार भडकले; म्हणाले…

-रूप बदलणाऱ्या राज ठाकरेंवर काँग्रेसचा पहिला वार!