चौकार आणि षटकारांच्या फटकेबाजीत विराट कोहलीने ‘या’ खेळाडूंनाही टाकले मागे…!

नवी दिल्ली | २०२० च्या आयपीएल मोसमात क्रीडा रसिकांना अनेक चांगले सामने पाहायला मिळाले. काही वेळा उत्तम गोलंदाजी, काही वेळा उत्तम फलंदाजी तर काही वेळा उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते.

या वर्षीच्या आयपीएल मोसमात अनेक नवखे खेळाडू नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आयपीएलमधील २५ वा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधार विराट कोहली यांनी ९० धावा केल्या. या डावात कोहली यांनी चार चौकार आणि चार षटकार मारत आपल्या संघाची धावसंख्या मजबूत केली.

विराट कोहली यांच्या चौकार आणि षटकारांमुळे आता ते आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. या बाबतीत त्यांनी गौतम गंभीर आणि सुरेश रैना या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे.

पण चौकारांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर शिखर धवन आहे. आयपीएलमध्ये विराट कोहली यांनी ४९३ चौकार मारले आहे. सर्वात प्रथम त्यांनी गौतम गंभीर यांना मागे टाकले, त्यांचे ४९१ चौकार आहे. पण विराट कोहली हे आता सुरेश रैना यांच्याबरोबरच आहे.

विराट कोहली आणि सुरेश रैना चौकारांच्या बाबतीत बरोबरच आहे पण विराट यांनी कमी सामन्यांमध्ये एवढे चौकार मारले आहे. विराट कोहली यांनी १८३ सामन्यात ४९३ चौकार मारले आहे. सुरेश रैना यांनी १९३ सामन्यात ४९३ चौकार मारले आहे.

आयपीएलमध्ये सर्वात जास्त चौकार मारण्याच्या बाबतीत शिखर धवन पहिल्या क्रमांकावर आहे, त्यांनी १६५ सामन्यात ५३७ चौकार मारले आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त षटकारांबाबत बोलायचं झालं तर या यादीत सुरेश रैना हे सहाव्या क्रमांकावर आहे.

सुरेश रैना यांनी १९३ सामन्यांमध्ये १९४ षटकार मारले आहे. विराट कोहली हे पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी १८३ सामन्यांमध्ये १९७ षटकार मारले आहे. यातच रोहित शर्मा हे चौथ्या क्रमांकावर असून त्यांनी १९४ सामन्यांमध्ये २०८ षटकार मारले आहे.

या यादीत महेंद्रसिंह धोनी हे तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी १९७ सामन्यांमध्ये २१४ षटकार मारले आहे. एबी डिव्हीलियर्स हे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांनी १६० सामन्यांमध्ये २१९ षटकार मारले आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, त्यांनी केवळ १२५ सामन्यांमध्ये ३२६ षटकार मारले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणी मोठी बातमी! सुशांतचा मित्र सॅम्युअलला ‘या’ व्यक्तीनं दिली जीवे मा.रण्याची ध.मकी

धक्कादायक! महेंद्रसिंग धोनीच्या पाच वर्षीय मुलीवर ब.लात्कार करण्याची ‘या’ व्यक्तीनं दिली ध.मकी

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! रिया आणि सुशांत बद्दलचा ‘तो’ दावा खोटा

सुशांत प्रकरणी ‘या’ प्रसिध्द अभिनेत्यानं केलं वा.दग्रस्त वक्तव्य म्हणाला…

राहुल तेवतिया आणि डेव्हिड वॉर्नरमध्ये नेमकं काय झालं?; पाहा संपूर्ण व्हिडीओ