जिवलग मित्र वाजिद खानच्या निधनावर सलमानचं भावनिक ट्विट

मुंबई | बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचं मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. त्यांनी अभिनेता सलमान खान यांच्या बऱ्याचश्या चित्रपटांना संगीत दिलं होतं. त्यांच्या निधनानंतर सलमान खानने भावूक ट्विट करत त्यांच्या प्रति आदरांजली अर्पित केली आहे.

वाजिदसाठी नेहमी प्रेम आणि सन्मान राहिल. वाजिदचं टॅलेंट आणि व्यक्तीमत्व नेहमी लक्षात ठेवेल. खूप सारं प्रेम. तुझ्या सूंदर आत्म्याला शांती ला, अशा शब्दात सलमान खानने शोक व्यक्त केला आहे.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचं निधन झालं. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत.

वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

कोरोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-आम्हाला सलून उघडायला परवानगी द्या, नाहीतर….; सलून व्यावसायिक आक्रमक

-पक्षाला मिळालेल्या यशात आमचा थोडा तरी वाटा असेल ना?; सत्यजित तांबेंचं कार्यकर्त्यांची खदखद मांडणार पत्र

-हार्दिक पांड्या म्हणतो, कुणी तरी येणार येणार गं…!

-‘सरकारने काम केलं नसतं तर…’; गुजरात उच्च न्यायालयाकडून आता सरकारचं कौतुक

-गरिबांना वाऱ्यावरती सोडणारे हे श्रीमंतांचे सरकार आहे – प्रकाश आंबेडकर