…अन् अखेर वारकरी संप्रदायाच्या आक्रमकतेसमोर पोलीस अधिकारी नमला!

जळगाव | जळगावात भजन कीर्तन चालू असताना पोलीस अधिकारी चुकीचा वागल्यानं सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड घडली आहे.

चाळीसगावात कीर्तन सुरू असताना पोलीस अधिकारी बुटासहीत नारद गादीवर उभारल्यानं वारकरी संप्रदाय नाराज झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी चुकीच्या पद्धतीनं व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर वाद उद्भवला आहे.

वारकरी संप्रदायात नारदाच्या गादीला एक वेगळा मान आहे. नारदाच्या गादीवर अनवाणी पायानं उभारण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे. पण पाटील यांनी या प्रथेचा अपमान केला आहे.

वारकरी संप्रदायातर्फे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेऊन निषेध व्यक्त केला जाणार आहे. अशातच आता के. के. पाटील यांनी माफी मागीतली आहे.

चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपुत नगरमधील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन सप्ताहाचा कार्यक्रम रात्री 10 नंतर सुरू होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.

पेट्रोलिंग करत असताना त्या भागातून मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. त्यावेळी आम्ही महाराजांना रात्री दहानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की आवाज करू नका, असं सांगितलं. यावेळी माझ्या पायात बुट होते मी अनावधानानं त्या गादीवर  गेलो, असं स्पष्टीकरण अधिकाऱ्याने दिलं आहे.

दरम्यान, वारकरी संप्रदाय किंवा इतर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असंही पाटील म्हणाले आहेत. परिणामी आता या प्रकरणावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “…तर मी कॅमेऱ्यासमोर पूर्णपणे टॉपलेस होईन”, अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला