“राष्ट्रवादीला युतीत शिवसेना नको होती, पण…”; रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई |  महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये दिवसेंदिवस अधिक संघर्ष होत आहे. भाजपचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आता काही जुन्या गोष्टींवर भाष्य केलं आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप-राष्ट्रवादी 2017 मध्ये एकत्र येणार होते, असं वक्तव्य केलं होतं. आता दानवे यांनी या वक्तव्याला जोडून काही वक्तव्य केली आहेत.

भाजप-राष्ट्रवादीमध्ये सत्तेबाबात काही खलबत चालू होती त्यावेळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रावसाहेब दानवे होते. परिणामी दानवेंच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झालं आहे.

राष्ट्रवादी आणि आमच्यात त्यावेळी चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीनं अचानकपणे चर्चेतून माघार घेतली. राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार असावं असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं, असा गौप्यस्फोट दानवेंनी केला आहे.

राष्ट्रवादीला युतीमध्ये शिवसेना नको होती, असं देखील रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. मात्र गेली 25-30 वर्ष झालं आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि आम्ही त्यांना धोका देणं हे बरोबर नाही, असं आम्हाला वाटल्याचंही दानवे म्हणाले आहेत.

शिवसेनेला सोबत घेण्यास काय हरकत आहे, आपण काॅमन मिनिमम प्रोग्राम बनवू असं आम्ही म्हटलं होतं, असंही रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

आमची आणि शिवसेनेची विचारधारा एक आहे त्यामुळं आम्ही त्यांना सोडून सरकार बनवू शकत नाही, असं आम्ही राष्ट्रवादीला सांगितल्याचं देखील दानवे म्हणाले आहेत.

दरम्यान, आम्हाला काही गोष्टी उकरून काढायच्या नाहीत पण ते काढतात म्हणून आम्हाला काढाव्या लागतात, असा टोला दानवेंनी शिवसेनेला लगावला आहे. दानवेंच्या या वक्तव्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“देवेंद्र फडणवीस वर्षभरात राज्याचे मुख्यमंत्री होतील”, चंद्रकांत पाटलांचा दावा

 पंजाबमध्ये मोठा राडा! शिवसेना आणि शीख संघटना एकमेकांना भिडले, SHO जखमी

“…तर राज ठाकरेंची सभा उधळून लावणार” 

‘…तर कुणी मानसिक रोगी’; जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला 

मोठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्यावर बलात्काराचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ