स्केटींग करता करता तरूण-तरूणीने केला भन्नात डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ कधी धक्कादायक असतात. तर कधी प्रेरणा देणारेही असतात.

आपल्याला माहित आहे की, स्केटिंग करण तसं पाहायला गेलं तर सोपी गोष्ट नाहीय. त्यासाठी कित्येक दिवस प्रॅक्टिस करावी लागते. त्याचबरोबर सातत्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या संपूर्ण शरिराचा तोल व्यवस्थित सांभळता आला पाहिजे.

तर अशातच एक सोशल मीडियावर याच संदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क एक तरूण-तरूणी स्केटिंग करत डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

एका स्टेजवर एक मुलगा आणि एक मुलगी एकमेकांच्या हातात हात धरून खूप जबरदस्त डान्स करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या पायामध्ये त्यांनी स्केटिंग करताना जे शूज वापरले जातात, ते घातले आहेत. परंतू ते खूप सहजरित्या वेगवेगळ्या स्टेप्स करत आहेत.

त्याचप्रमाणे व्हिडओतील मुलगा त्या मुलीली आपल्या दोन्ही हातांनी पकडून खूप जोरजोरात फिरवत असल्याचंही दिसून येतं आहे. ते ज्या प्रकारे डान्सच्या इतक्या अवघड स्टेप्स करत आहेत. त्यावरून असं वाटतं आहे की, त्यांना स्केटिंग करता-करता डान्स करायचा खूप सराव असावा.

तसेच त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका यूजरने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंवरून शेअर केला असल्याचं समजत असून, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स देखील केलं आहे.

https://www.instagram.com/p/CURbfuTlEuj/

महत्वाच्या बातम्या-

कौतुकास्पद! सायकल चालवताना तरूणाने केला अनोखा स्टंट, पाहा व्हिडीओ

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेतील नेहा आणि परिचे ‘हे’ फोटो होतायत तूफान व्हायरल, पाहा फोटो

काय सांगता! चक्क जंगलाचा राजा सिंह ‘या’ प्राण्याला पाहून गेला पळून, पाहा व्हिडीओ

ऐकावं ते नवलंच! चक्क पुरूष करतोय बिकनी घालून पोल डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

चवताळलेल्या हत्तीने बसला दिली टक्कर अन्…, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ